आज सायंकाळी ७ च्या सुमारास राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.आज दिवसभर धरणाचे हे दरवाजे उघडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर संध्याकाळी ३ व ६ क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडून त्यातून विसर्ग सुरू झाला. सध्या यातून सुमारे ४००० क्यूसेक पाणी भोगावती नदीपात्रात जात आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0 Comments