बार्शी/प्रतिनिधी;
गेल्या पाच महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे बंद करण्याचा आदेश असल्यामुळे वर्षीचे ग्रामदैवत भगवंत मंदिर कुलूपबंद आहे. आषाढी एकादशी, श्रावण महिन्यात भगवंत मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने असतात. कोरोनामुळे सगळे वातावरण बदलले आहे, हळूहळू आता धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
सर्वसामान्य नागरिकांतुन भगवंत मंदिर दर्शनासाठी खुले झालीच पाहिजे अशी मागणी होताना दिसत आहे. एकंदरीतच बार्शी नागरिकांना भगवंताच्या दर्शनाचे आस लागल्याचे चित्र दिसत आहे. ३१ ऑगस्टला डॉ. प्रकाश आंबेडकर पंढरपूर मध्ये आंदोलन करणार असल्याचेही समजते, दोन लाख वारकरी घेऊन पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई मंदिर उघडण्यासाठी ते आंदोलन करणार आहेत.
0 Comments