भारतीय नागरिक आपल्या कर्तृत्वाचा ठसा विविध क्षेत्रात उमटवत आहेत आता सिंगापूरच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय वंशाचे नेते प्रीतम सिंह यांची सोमवारी वर्णी लागली. विरोधी पक्ष नेतेपदांची सूत्रे हातात घेऊन त्यांनी इतिहास रचला आहे.
कामगार पक्षातर्फे त्यांची निवड विरोधी पक्षनेतेपदी करण्यात आली, संसदेच्या पहिल्या अधिवेशनात सभागृह नेत्या इंद्राणी राजा यांनी ४३ वर्षीय प्रीतम सिंह यांना औपचारिकरित्या विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता दिली. याचबरोबर ते सिंगापूरचे पंतप्रधान ली सिन लांग यांच्या समोर बसणार आहेत.
0 Comments