शांतता....!! तपास अजून संपला नाही; द शाे मस्ट गाे ऑन


राकेश करमळकर/आजरा:
       
ही गोष्ट सुरू होते ती गवसे चेक पोस्ट वरील पोलिसाने केलेल्या मदतीपासून. त्या माणसाचा व त्याच्या जवळील उपाशी बाळास दिलेला जेवणाचा डबा ही माणुसकी फक्त पोलिसांनीच नाही तर प्रत्येक नागरिकाने दाखवली पाहिजे. प्रत्यक्षात मात्र ते लहान बाळ चोरीचे असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर त्या मदत केलेल्या पोलिसांवरच बोट दाखवण्यात आले त्याबद्दल उलट-सुलट चर्चा करण्यात आल्या असे झाल्यास पुढील काळात कोणी कोणाच्या मदतीला जाणार नाही हे मात्र नक्की.
        
गवसे चेक पोस्टवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या इसमास सोलापूरला पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली .सोलापूरला पोचल्यावर त्याच्याकडील छोटे बाळ पाहून अकलूज पोलिसांनी त्या इसमास हटकले. ते बाळ कुठून आणले कोणाचे आहे त्याबद्दल त्या इसमास विचारपूस करण्यात आली. त्या बाळाच्या आई-वडिलांचा शोध लावण्यासाठी अकलूज पोलीस चक्क गोव्यापर्यंत जाऊन पोचले तेथे जाऊन त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचा शोध लावला त्याच्या आई- वडिलांचे नाव पूजा क्षेत्री, आनंद क्षेत्री आहे असे कळते.
       
हि कथा इथे संपली असे नाही ती चालूच राहणार आहे. अकलुज पाेलिसानी गाेव्याहुन येताना गवसे( ता. आजरा) चेक पाेस्टवर थांबून दिलेली माहिती विचार करायला लावणारी आहे. त्या माता पित्याने ते बाळ त्या व्यक्तिला बाळगण्यासाठी दिले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पाेलिस खरेच ते त्या मुलाचे आई वडिल आहेत का याची जेैविक चाचणी घेणार आहेत. त्या माता पित्याना ते मुल बाळगणे जड हाेते. हे आपण खरे माणूया पण हे का घडले. हे तळात जाऊन पाहण्याची गरज आहे. त्यावेळी आपण कुठे चुकताे हे कळेल. केवळ वर वर च्या गाेष्टीवर आपली मत तयार करुन चालणार नाहीत . सत्य आणि वस्तुस्थिती तपासलो पाहीजे. मग काेण दाेषी. माणुसकी दाखवलेले पाेलिस,नाक्यावरील कर्मचारी ,स्पर्धा तयार करण्यात आलेल्या जगात केवळ ऐकिवात गाेष्टिवर धावणारी उथऴपणा दाखवणारी समाज माध्यम आणि व् व्यवस्था अजुन बर काही बाकी आहे. शाे मस्ट गाे ऑन..

Post a Comment

0 Comments