राकेश करमळकर/आजरा;
मंगळवार दिनांक १८ रोजी आजरा तालुक्यामध्ये पुन्हा नव्याने नऊ जण कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामधील पाच रुग्ण आजरा शहरांमधील आहेत. तर उर्वरित चार रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. गणेश चतुर्थीच्या तोंडावर शहरां मधील वाढती रुग्ण संख्या पाहता शहरात समूह संसर्गाचा धोका वाढताना दिसत आहे.
आजरा शहरांमध्ये जिजामाता कॉलनी, नाईक गल्ली, दर्गा गल्ली येथील प्रत्येकी एक तर कुंभार गल्ली येथील दोघेजण कोरोना बाधित झाले आहेत. तालुक्यामध्ये कोवाडे येथे एक जण तर भादवणवाडी येथे तिघांचा अहवाल पॉझिटिव आला आहे.
आतापर्यंत तालुक्यामध्ये २५८ रुग्ण बाधित झाले आहेत तर आजरा शहरांमध्ये हा आकडा ९० इतका आहे. २०१एक रुग्ण कोरोना मुक्त होऊन सुखरूप घरी गेले आहेत. आतापर्यंत पाच जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
जिजामाता काॅलनी १ पुरुष वय ५० वर्ष, नाईक गल्ली १ पुरुष वय २२वर्ष, कुंभार गल्ली , स्त्री ३२वर्ष ,पुरुष वय ३४ वर्ष, दर्गा गल्ली एक पुरुष ६१ वर्ष,
कोवाडे १ जण पुरुष वय ६६ भादवणवाडी - पुरुष वय ३०, बालक ७ वर्ष, बालिका वय ४ वर्ष अशी बधितांची माहिती आहे.
0 Comments