पंढरपूर/प्रतिनिधी:
लॉकडाऊन यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यापासून बंद असलेले महाराष्ट्रातील मंदिरे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आज पंढरपूर मध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर नामदेव पायरी येथे "दार उघड उद्धवा दार उघड " म्हणत घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी विविध घोषणा घंटा देत, सरकार आरोप करत, मॉल उघडता, बाजारपेठ चालू करता धार्मिक स्थळे देवस्थाने बंद का असा सवालही करण्यात आला? महाविकास आघाडी चा धिक्कार असो अशी घोषणाबाजी करण्यात आली.
0 Comments