आजरा तालुक्यामध्ये अकरा जण कोरोना बाधित


राकेश करमळकर/आजरा:
         
गुरुवार दिनांक २० रोजी आजरा तालुक्यामध्ये पुन्हा नव्याने नऊ जण कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामधील आठ रुग्ण आजरा शहरांमधील आहेत. तर उर्वरित ३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. गणेश चतुर्थीच्या तोंडावर शहरां मधील वाढती रुग्ण संख्या पाहता शहरात समूह संसर्गाचा धोका वाढताना दिसत आहे.
           
आजरा शहरांमध्ये जिजामाता कॉलनी , दर्गा गल्ली येथील प्रत्येकी तीन तर भूमी अभिलेख कार्यालय येथील दोघेजण कोरोना बाधित झाले आहेत. तालुक्यामध्ये बोलकेवाडी येथे एक जण तर भादवण येथे २ जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. आतापर्यंत तालुक्यामध्ये २७८ रुग्ण बाधित झाले आहेत . आजरा शहरांमध्ये हा आकडा १०० पार इतका आहे. आत्तापर्यंत २१२ रुग्ण कोरोना मुक्त होऊन सुखरूप घरी गेले आहेत. ६१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. पाच जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
जिजामाता काॅलनी ३ रुग्ण
      १ स्त्री-वय ५२,
       २ पुरुष-वय २७ व २० वर्ष,
दर्गा गल्ली ३ रुग्ण
      १ स्त्री-वय ६५,  १ बालिका-वय ०६
      १ पुरुष -वय ७१ वर्ष,
भूमी अभिलेख कार्यालय २ रुग्ण
      २ पुरुष, वय ४१ व २८ वर्ष,
भादवण २ रुग्ण
         १ पुरुष - वय ५०
         १  स्त्री- वय  ४०
बोलकेवाडी १ रुग्ण -
        १ पुरुष - वय २१ वर्ष.

Post a Comment

0 Comments