रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी



युवक तालुका सरचिटणीस अरविंद रगडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

कोरोना सारख्या महामारीच्या काळात लोकांची गैरसोय होऊ स्वतः पुढाकार घेऊन आणि रक्ताची गरज लक्षात घेता ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हे बोधवाक्य कृतीतून अंगीकारण्याच्या उद्देशाने युवक भाजपा सरचिटणीस अरविंद रगडे नागरिकांना आवाहन केले. त्यानुसार नागरिकांनी रक्तदानला भरघोस प्रतिसाद दिला.

कोविड-१९ या आजाराने जगभरात थैमान मांडले आहे. अशा परिस्थितीत रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली होती. मात्र, रक्ताचा तुटवडा होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळून व इतर दक्षता घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.  म्हणून सोशल डिस्टन्सिंग आणि शिस्त पाळून रक्तदान केले. शासनाच्या नियमांचे पालन करून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून रक्तपेढ्या वा रक्तदान शिबिरे संकलनाचे काम करत आहेत. 

Post a Comment

0 Comments