मातोश्री च्या आजी आजोबांना घडले डिजिटल गणेशउत्सव दर्शन

कोल्हापूर: रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर दर वर्षी मातोश्री मधील आजी आजोबांसाठी कोल्हापुरातील मानाच्या गणपतींची दर्शन आणि आरती घडवून आणते. कोल्हापूरच्या वेग-वेगळ्या भागांमध्ये हे गणेश दर्शन घडवून आणले जाते त्यामुळे मातोश्री गणेशउत्सव हा तेथील आजी आजोबांसाठी एक पर्वणीच असते.
यंदा च्या वर्षी कोरोनामुळे गणेशउत्सवावर खूप मर्यादा आल्या. दरवर्षी चालत आलेली हि गणेशउत्सव दर्शन ची प्रथा खंडित होऊ नये या साठी रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर तर्फे मातोश्री मध्ये सुरक्षित सामाजिक आंतर राखत डिजिटल गणेशउत्सव दर्शन चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोल्हापुरातील सर्व गणपतींचे दर्शन तसेच पुणे व मुंबई येथील मागील वर्षीची विसर्जन मिरवणूक हि दाखविण्यात आली. या वेळी रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर चे अध्यक्ष अभिजीत पाटील. सेक्रेटरी मानव गुळवणी, यश मालगावे, श्रेयस पाटील, सुधांशू रुकडीकर, प्रत्युष दोषी, अस्मिता शहा उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments