राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने प्रशासनावर हुकूमत असलेला, ग्रामीण महाराष्ट्राची जाण असलेला आणि शिस्तप्रिय राजकारणी हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनावर मात केली होती, अचानक तब्बेत बिघडली, त्याच्या जाण्याने मार्गदर्शक नेता गमवल्याचे जाणकार मंडळी दुःख व्यक्त करत आहेत.
निलेंगेकर- पाटील हे अतिशय शिस्तप्रिय राजकारणी म्हणून ओळखले जात होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांचा सरकारने गौरव केला होता. निलेंगकर-पाटील यांनी राज्याचे दहावे मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळली होती. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही ते होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या जाण्याने प्रशासनावर हुकूमत असलेला, ग्रामीण महाराष्ट्राची जाण असलेला आणि शिस्तप्रिय राजकारणी हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
0 Comments