विनापरवाना बैलांची वाहतूक; १८ जनावरे ताब्यात तर दोघांवर गुन्हे



राकेश करमळकर, आजरा
        
गवसे येथे बैलांची वाहतूक करणारा ट्रक  रविवारी रात्री ११ च्या सुमारास आजरा  पोलिसाने पकडला. या ट्रकमध्ये असणाऱ्या बैलांची किंमत चार लाख पंचेचाळीस हजार इतकी आहे. तर या ट्रकमध्ये असणारी जनावरांची संख्या १८ आहे. ही सर्व जनावरे ताब्यात घेण्यात आले आहे.
           
पोलीस शिपाई विशाल आंबोळे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली यात एम. एच.०९ सी. यु.४९९६  या ट्रकमध्ये गवसे चेक पोस्ट येथे अवैध वाहतूक करताना आढळले. तपासणी केली असता त्यामध्ये जनावरे आढळून आली या जनावरांची किंमत सुमारे चार लाख, ४५ हजार इतकी आहे तर हा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे , मोहसीन खुदबुद्दीन शिकलगार (वय ३०) व अक्रम नूरुद्दीन इंचानाळकर (वय ५२) दोघेही राहणारा आजरा, यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्ता शिंदे,पोलीस नाईक संतोष घस्ती , पोलीस शिपाई विशाल आंबोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments