स्थलांतरीत कामगारांना गावी जाण्याची इच्छा असल्यास संकेतस्थळावर माहिती भरावी देशभरात कोरोना महासंकट थैमान घालत असतानाच दुसरीकडे विविध ठिकाणी अनेक स्थलांतरित कामगार अडकून पडलेले आहेत. अशा स्थलांतरीत कामगारांना आपल्या गावी जाण्याची इच्छा असल्यास त्यांनी https://migrant.mahabocw.in/migrant/from या संकेतस्थळावर माहिती भरावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे.

(छायाचित्र सौजन्य- qz.com)

   नियमित रेल्वे सेवा दिनांक १२ ऑगस्ट २०२० पर्यंत स्थगित आल्याने दिनांक १२ ऑगस्ट  पर्यंत स्थलांतरीत कामगारांनी माहिती संकेतस्थळावर भरावी. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कामगार कार्यालय येथे स्थापित केले गेलेल्या सहाय्यता केंद्रातून सर्व योजनांची व इतर सहाय्यता केंद्रांची माहिती मिळेल.  
 

Post a Comment

0 Comments