कोल्हापूर कोरोना अपडेट: आजअखेर १०७१ जणांना डिस्चार्ज-डॉ. बी. सी. केम्पी पाटील

आज सकाळी १० वाजेपर्यंत ४७५ प्राप्त अहवालापैकी ३०२ निगेटिव्ह तर ८७ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (२ अहवाल नाकारण्यात आले आहेत.) तर ६० अहवाल प्रलंबित आहेत. प्रतिजन चाचणीचे २ प्राप्त अहवालापैकी २ निगेटिव्ह आहेत, एकूण ८७ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण २८२७ पॉझीटिव्हपैकी १०७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण १६८५ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.


◆आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त ८७ पॉझीटिव्ह अहवालापैकी:

 भुदरगड-५, चंदगड-३, गडहिंग्लज- ४, हातकणंगले- २१, कागल-१, करवीर-३, पन्हाळा-३, नगरपालिका क्षेत्र- २६, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- २१ असा समावेश आहे. 

◆आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:

आजरा- १००, भुदरगड- ९२, चंदगड- ३२२, गडहिंग्लज- १६८, गगनबावडा- ७, हातकणंगले- १६५, कागल- ७२, करवीर- २९९, पन्हाळा- ११८, राधानगरी- ९६, शाहूवाडी- २२९, शिरोळ- ७६, नगरपरिषद क्षेत्र- ६४०, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-३९८, असे एकूण २७८२ आणि जिल्हा व राज्यातील ४५ असे मिळून एकूण २८२७ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण २८२७ पॉझीटिव्ह रूग्णांपैकी १०७१ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ७१ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या १६८५ इतकी आहे.

Post a Comment

0 Comments