जयसिंगपूर व संपूर्ण जिल्ह्यातच कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, तपासणी व चाचणी साठी कोल्हापूर येथे असलेल्या चाचणी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर त्याचा ताण पडत आहे. त्यापार्श्वभूमीवर पर्यायी व्यवस्था करण्याची गरज ओळखून जयसिंगपूर येथे कोल्हापूर रोडवरील डॉ.जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये अँटीजेन टेस्ट सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज या अँटीजेन सेंटरचा शुभारंभ पार पडला.
नागरिकांच्या आरोग्यावर व तपासणी सुविधेवर पडणारा प्रचंड ताण याद्वारे कमी केला जाणार आहे. तसेच टेस्टिंग नंतर लवकरात लवकर तपासणी अहवाल मिळणार असल्याने रुग्णांना मिळणारे उपचार ही लवकर मिळतील असा विश्वास आहे.
याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्री. केंम्पी पाटील, प्रांताधिकारी श्री. विकास खरात, तहसीलदार सौ. अपर्णा मोरे-धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्री. दातार, गटविकास अधिकारी श्री. कवितके, डॉ. श्री. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख श्री. विजय मगदूम, शिरोळचे नगराध्यक्ष डॉ. श्री. अमरसिंह माने -पाटील, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. श्री. खटावकर यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉक्टर्स, आरोग्य विभागातील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
0 Comments