राकेश करमळकर/आजरा:
आजरा तालुक्यामध्ये आज सात जणांचे अवहाल पॉझिटिव आले आहेत. यामध्ये चाफवडे भादवण व उत्तुर येथील प्रत्येकी एक असा तिघा जणांचा समावेश आहे
तर आजरा शहरांमध्ये आज नव्याने चौघांचे अवहाल पॉझिटिव्ह आले यामध्ये नगरसेविकेच्या पतीसह त्याच घरातील एक जण,आजऱ्यातील एक प्रसिद्ध डॉक्टर व अन्य एकाचा समावेश आहे. संबंधित डॉक्टरांच्या संपर्कातील रुग्णांची यादी तयार करण्यात येणार आहे. शहरातील संभाजी चौकाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
समूह संसर्गाच्या काळामध्ये शहरांमध्ये वाढती रुग्ण संख्या पाहता शहरवासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.शहरात काल एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्यामध्ये आतापर्यंत तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या आता १२१ इतकी झाली आहे.
0 Comments