काहीतरी चुकतंय ….
✒️ शरद कदम-पाटील ( B.Sc.Agri)
व्यूहान हे नाव कदाचित मलाच माहिती नव्हतं अस नाही , तर या पृथ्वीतलावावरील बऱ्याच जीवांना हे अनोळखी होते . नववर्षाच्या स्वागतासाठी च की काय या शहरातून CORONA नावाचा अत्यंत त्रासदायी असा हा विषाणू COVID-19 या बटालियन च्या नावाखाली धाडला होता . चिनी नववर्ष हे या विषाणू च्या सहवासात आले , तस या विषाणूने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली . या विषाणू ने आपलं साम्राज्य बलाढ्य करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ज्या शहराने याला जन्म दिला त्यांच्याच मानगुटीवर याने पहिला हल्ला चढवला . जसं की त्याला माहिती होतं की काय या चिनी लोकांनी आपल्या म्हणजे corona च्या हाती जग संपवण्याच काम दिल आहे म्हणजे हे वाईट , काम करण्यापूर्वी मी तुमचा काटा बसवतो असाच विचार त्यानं केला असावा . विषाणू जिवंत गोष्टीमध्येच जगू शकतो म्हणजे त्याला देखील या जीवांची जगण्यापूर्ती गरज होती ..परिणामी या लोकांनी त्या विषाणू चा वापर सगळे जीव धोक्यात घालण्यासाठी केला. बघता बघता या चिनी लोकांची फुफ्फुसे कधी पोखरून खाल्ली हे समजलचं नाही . रुग्णाची संख्या वाढत गेली , व्यूहान शहर कडेकोट बंद करण्यात आलं . या विषाणूमागचा अभ्यास या लोकांचा असावा , परंतु जगाला वेड्यात काढण्याचं काम यांनी केलं . रुग्णाची संख्या वाढली ..थोडेफार मृत्यू देखील झाले ..काही काळानंतर यांचा बाजार सुरळीत चालू झाला .रस्ते चालू झाले ..जनजीवन पूर्ववत सुरू झाले परंतु हा कोरोना इथेच थांबणार नव्हता ..चिनी लोकांनी ठरवलेल्या मोहिमेवर हे COVID 19 च बटालियन सिकंदर बनून जगावर राज्य करण्यासाठी निघालं .
जगातील बलाढ्य साम्राज्य आणि त्यांचा धनसाठा याचा अभ्यास जणू याला माहितीच होता . समृद्ध अशी युरोपियन राष्ट्र , तसेच आखाती देश आणि महासत्ता अमेरिका आणि बरेच देश यांचा दारुगोळा डिवचण्याचं काम कोरोना ने केलं . त्याच्या लक्षात नाही आलं की हाच दारुगोळा हे समृद्ध जग संपवू शकतो . पुढे चालून मी केलेल्या चुकीचा परिणाम हे निरागस , कोणतीही चूक नसलेलं जग भोगणार काय ...हा चालेल काहीही झाले तरी मी ही मोहीम अर्ध्यात नाही सोडणार . इटली , फ्रान्स , जर्मनी या नावातच नाही तर यांच्या कामगिरीत देखील दम होता , परंतु त्यांचा दम कधी कोंढला गेला हे कळलेच नाही . वैद्यकीय सेवा उपलब्ध करता करता डॉक्टरांचे फुफ्फुस या विषाणू ने कधी भरून गेलं हे देखील समजलं नाही . बलाढ्य राष्ट्रांनी या चिनी सैनिकापुढे हात टेकले . सर्व वैद्यकीय संस्था हतबल झाल्या, धुसमुसुन रडू लागल्या , काही जणांनी तर या युद्धात लढण्यापूर्वी च हार पत्करली . प्रसंगच असा आहे की यामध्ये माणूसच नव्हे तर कोणीच एकमेकांना हात देऊ शकत नाही . तरी देखील या कठीण परिस्थितीत अनेक देवदूत जन्माला आले ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून या आगीतून जग बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . या विषाणू वर उपायकारक लस तर अजूनपर्यंत नाही भेटली , काही काळातच ती तयार होईल असा आशावाद आहे . जगावर राज्य करायचं ठरवून आलेला कोरोना आपल्या भारत देशाला तरी कसा सुट्टी देईल .मग निघाला आपल्या स्वारीवर, आखाती देशातून त्याने आपली मोहीम भारत या उमलत्या नेतृत्वाकडे वळवली . गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर भारताला खिंडीत गाठून नजरकैद केले . याठिकाणी त्याचं साम्राज्य उभा करायचं कोरोनाला जरासं अवघड च होतं .परंतु त्यानं देखील एक युद्धनीती बरोबर वापरली ती म्हणजे संयम.
दमाने जगू लागला अन हळू हळू या राष्ट्राचा श्वास बंद केला . झालं अशक्य या विळख्यातून बाहेर पडायचं , गुदमरला माझा देश , झाल्या हालचाली सुरू , घेतली मशाल डोक्यावर हा अंधकार मिटवण्यासाठी , काही योद्धे तयार झाले या शत्रू ला फाडण्यासाठी . खरं तर भारत या राष्ट्राचा सुरुवातीचा दम असा जोमात होता , की काहीसं युध्द जिंकल्यात जमा होत , परंतु काही अनपेक्षित चुका आपल्या नागरिकांनी केल्या . कामाव्यतिरिक्त बाहेर पडणे , एकमेकांच्या संपर्कात येणे आणि बरेच काही या आजाराला निमंत्रण च देत होत . सुरू झाली lockdown ची राजवट ..4 lockdown झाले ….परंतु हा कोरोना हारायला तयार च नाही . या आणीबाणी च्या काळात आपलं राज्य अन देश अनेक संकटाच्या कचाट्यात सापडत आहे .काही न बघवणारे प्रसंग घडत आहेत . प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे . परंतु ही महामारी एवढी बलशाली आहे की आपली रणनीती कमी पडत आहे . मजुरांचे होणारे हाल , लाखो लोकांची होणारी उपासमार , हातावरच्या पोटासाठी व्याकूळ कारागीर अन कामगार , मोठ्या प्रमाणात बेरोजगारी , स्थलांतर अशा बिकट परिस्थितीचा उगम .ही आपल्या साठी धोक्याची घंटा तर नाही ना ! या दलदलीतुन बाहेर पडायचे उपाय शोधण्यात आपले लाखो योद्धे अहोरात्र लढत आहेत ,सलाम त्यांच्या कार्याला !! ही महामारीची मोहीम आपण नक्कीच संपवणार असा माझा विश्वास आहे परंतू हे संकट आपल्या पाठीवर मांड ठोकून बसलेले असतानाच आणखी काही परकीय स्वाऱ्या आपल्या कडे वळल्या , त्या म्हणजे नुकतीच आलेली टोळधाड . या जगात शेतकरी हा वर्ग जरासा या कोरोना च्या तावडीतून निसटला होता , परंतु या टोळधाडी ने यांच पण हृदय बंद केलं.असेल ते पीक फस्त करण्यात हे टोळ मग्न झाले . आणखी एक संकट उभे राहिले टोळधाड . त्यांनतर प्राणी अन वनस्पती देखील सौख्याने नांदत असलेले बघवले नाही , मग आला वणवा , 4- 5 दिवसापासून जळत असलेलं उत्तराखंडचं जंगल विझता विझना . त्यात आणखी चीन आणि अमेरिका यांच्यात सुरू झालेले शीतयुद्ध आणखीनच आग ओखत आहे . आपला शेवट नक्कीच जवळ आला आहे . धैर्याने लढा अन विजय मिळवा . पुन्हा असं काही वेगळं बोलू नका , झालं हतबल सरकार , संपल्या सगळ्या आश्या , यांचे हात टेकले , याना काय़ जमणार , आम्ही असतो तर , कोरोना आलाच नसता , आम्ही काय काय केलं असतं ..झाली यांची कुबुद्धी जागी , उठाव आले , मोर्चे आले . अरे काय माणूस आहेत की कोण , देश चालवणारे , राज्य चालवणारे पण आपल्यासारखेच आहेत न , करा ना त्यांना मदत . असेल अनुभव तर द्या ना धीर ..जे जे आहेत या युद्धाचे वीर , त्यांना मारू नका असे शाब्दिक तीर . का करताय हेवेदावे , धैर्याने जगा , मदतीचा सागर उभा करा , प्रेमाचं जग तयार करा , आपण नक्कीच हे युद्ध जिंकू ..अन विचार करायला विसरू नका ...
काहीतरी चुकतंय .. !
काहीतरी चुकतंय .. !!
🙏घरीच राहा ! सुरक्षित राहा !! 🙏
1 Comments
Bhaii 1 No... 👍👍👍
ReplyDelete