मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटव्ह आला आहे. ते म्हणाले की, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना आवाहन आहे की, त्यांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी. तसेच संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाइन व्हावे.
मुख्यमंत्र्यांनी स्वतः याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. माझी सर्व साथिदारांना विनंती आहे की, जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी. माझ्या नियमित संपर्कात येणाऱ्यांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये जावे. याविषयी त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
0 Comments