जवळा/प्रतिनिधी;
यंदाच्या निकालात सिरसाव जिल्हा परिषदेच्या सिरसाव शाळेत मुलीनी बाजी मारली आहे. दहावीच्या निकालांचा आलेख गेल्या चार पाच वर्षांपासून वाढतोच आहे.
सिरसाव जिल्हा परिषदेच्या शाळेची विद्यार्थिनी समृद्धी फुलचंद बोबडे हिने ९७.०० टक्के गुण मिळवत उस्मानाबाद जिल्हा परिषद ५२ शाळेतून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. याशिवाय प्रतीक्षा मुके हिने ९३.०० टक्के गुण मिळवत शाळेत द्वितीय क्रमांक मिळवला, तृतीय क्रमांक मुस्कान पटेल ९१.८० टक्के गुण हिचा आहे. पहिल्या तीन हि क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे.
२०१९-२०)
विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सी.व्ही.गोरे, बी.के.बन, कलशेट्टी व्ही.जी., शिर्के सर यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सरपंच प्रतिनिधी संजय पवार, उपसरपंच बिरमल बोबडे व सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.
0 Comments