जिल्ह्यातील उपलब्ध बेडच्या माहितीकरिता हेल्पलाईन सुरू

कोरोना कक्षातील उपलब्ध बेडची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध बेडची माहिती व्हावी आणि त्याठिकाणी त्वरित संबंधित रुग्णांवर उपचार व्हावेत या उद्देशाने हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या कक्षामुळे कोरोना रुग्ण नियंत्रण करणे सोपे होऊन, सर्वच गोष्टींमध्ये सुसूत्रता येईल. वेळेत उपचाराची मदत कोरोना बाधित रुग्णांना होईल. 

कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेड जाणून घेण्यासाठी  केंद्रीकृत यंत्रणा आवश्यकच होती. तसेच उपलब्ध बेड नुसार त्वरित रुग्णालयात दाखल होऊन योग्य उपचार रुग्णास मिळू शकतात. जेणेकरून रुग्णांचा जीव वाचेल.

Post a Comment

0 Comments