बार्शी |
भारतीय ट्रेड युनियन अधिनियम, 1926 अंतर्गत नोंदणीकृत नॅशनल ट्रेड युनियन ऑफ बहुजन एम्प्लॉईज (NTUBE) च्या मान्यतेनुसार असंघटित बांधकाम कामगार जिल्हा शाखा, सोलापूर (CWDEC) ची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अमीन कासीम गोरे यांची जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
अमीन कासीम गोरे यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील असंघटित बांधकाम कामगारांच्या समस्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, विविध शासकीय योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचविणे तसेच कामगारांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा उभारण्यास अधिक बळ मिळणार असल्याची भावना कामगारांमधून व्यक्त होत आहे.
NTUBE ही संघटना सरकारी, निमसरकारी, खासगी व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि कामगार कल्याणासाठी कार्यरत असून, नव्याने जाहीर झालेल्या जिल्हा कार्यकारिणीकडून सोलापूर जिल्ह्यात कामगारांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
अमीन कासीम गोरे यांनी आपल्या निवडीबद्दल संघटनेच्या राष्ट्रीय व राज्य नेतृत्वाचे आभार मानत, "असंघटित बांधकाम कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी प्रामाणिकपणे काम करणार," असा विश्वास व्यक्त केला.
0 Comments