श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या सतर्क सुरक्षारक्षकामुळे हरवलेली पर्स भाविक महिलेला परत


श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात (दिनांक 21 जुलै रोजी) देवीजींच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाची पर्स हरवली होती. मंदिर परिसरात कार्यरत असलेले सुरक्षारक्षक श्री. सोमनाथ भोकरे यांना सदर लेडीज पर्स सापडली. त्यांनी प्रामाणिकपणा व तत्परता दाखवत ती तात्काळ कंट्रोल रूम येथे जमा केली.

सदर पर्समध्ये काही रोख रक्कम, सोने सदृश्य कानातले तसेच इतर साहित्य होते. काही वेळानंतर संबंधित महिला भाविक सौ. कुलकर्णी (रा. लातूर) या कंट्रोल रूम येथे आल्या. पर्समधील वस्तूंची योग्य ओळख पटविल्यानंतर त्यांना त्यांची पर्स व त्यातील सर्व साहित्य सुरक्षितपणे परत करण्यात आले.
यावेळी भाविक महिलेने हरवलेली पर्स सुरक्षितपणे परत मिळाल्याबद्दल श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या सुरक्षा विभागाचे तसेच सुरक्षारक्षक श्री. सोमनाथ भोकरे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments