सोलापूर : मागील चार वर्षात चार पक्षाच्या संपर्कात राहिलेले माजी आमदार पुत्र भगीरथ भालके त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष प्रणिता भालके, अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
हजारोंचा जनसमुदाय या प्रवेश सोहळ्याला उपस्थित होता. माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्या भाषणात भगीरथ भालके यांना सल्ला दिला.
ते म्हणाले, महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुकीत शिवसेना ताकदीने लढली त्यामुळे पूर्वीपेक्षा जिल्ह्यात शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. मतांचा टक्का खाली न करता आणखी वर न्यायचा आहे, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना राज्याचा मुख्यमंत्री करायचे आहे. भगीरथ भालके, प्रणिता भालके, अनिल सावंत यांचा सेनेत प्रवेश होतोय, आता तुम्ही खच्चून कामाला लागा, प्रवास भरपूर झाला, आता तुम्ही थांबायला पाहिजे, सात मजले वर चढले पाहिजे. अन् ठाणा शेवटचे ठिकाण आहे तिथे थांबा. असा सल्ला म्हेत्रे यांनी दिला आहे.
0 Comments