रामप्पा चिवडशेट्टी यांचे तोंड पडले ; चेतनसिंह केदार यांच्या चेहऱ्यावर हास्य ; कुणाला मिळाली, कुठली समिती

 
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेवर आता भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण सत्ता स्थापन झाले आहे महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये 68 पैकी तब्बल 38 जागा जिंकून भाजपने एक हाती वर्चस्व सोलापूर झेडपीवर प्रस्थापित केले. 

काही दिवसांपूर्वीच अध्यक्षपदावर दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष पदावर इंद्रजीत पवार यांची निवड झाली त्यानंतर चार विषय समित्यांचे सभापती कोण अशी उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला होती.

शुक्रवारी पिठासीनाधिकारी गणेश निराळी यांच्या अध्यक्षतेखाली चार विषय समिती सभापतींच्या निवडी झाल्या. अपेक्षाप्रमाणे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांच्याकडे समाज कल्याण सभापती पद गेले. महिला बालकल्याण सभापती पदी युवा एडवोकेट अमृता वाघे यांना अनपेक्षित पणे संधी मिळाली आहे. दुसरीकडे सांगोल्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष झेडपी सदस्य चेतनसिंह केदार यांना आणि यंदा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पुन्हा अक्कलकोट ऐवजी दक्षिणला संधी देताना ज्येष्ठ नेते रामपा चिवडशेट्टी यांना सभापती पदाची संधी दिली. 

सभापती पदाचे अर्ज दाखल करतानाच चेतन केदारे यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली हे सभागृहात नाराज चेहऱ्याने आले त्यांनी अनेक नेत्यांना फोन लावले, ते शिक्षण व आरोग्य समितीसाठी आग्रही होते. चिवडशेट्टी यांना शिक्षण व आरोग्य समिती मिळेल अशी चर्चा होती. 

दरम्यान दुपारी दोन वाजता निवडीची सभा सुरू झाली सर्व समितीचे सभापती बिनविरोध झाले. त्यानंतर पिठासीन अधिकारी यांनी अध्यक्ष दीपक वैद्य सभेचे पुढील सूत्र हाती घेण्याच्या सूचना केल्या. यानंतर दीपक वैद्य यांनी सभापतींना विषय समित्यांचे वाटप केले. त्यामध्ये सुरुवातीलाच रामपा चिवडशेट्टी यांच्या नावापुढे कृषी व पशुसंवर्धन समिती असे वाचतात चिवडशेट्टी यांचा चेहरा प्रचंड नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर चेतनसिंह केदार यांच्या नावापुढे शिक्षण व आरोग्य समिती असे नाव येतात केदार अतिशय आनंदी दिसून आले.

यानंतर नाराज चेहऱ्याने चिवडशेट्टी यांनी आपला सत्कार स्वीकारला आणि ते आपल्या समर्थकांसह बाहेर गेले बरेच समर्थक बाहेर थांबून होते त्यांच्याशी ते काय बोलले समजले नाही परंतु कृषी पशुसंवर्धन मिळाल्याने चिवडशेट्टी यांची नाराजी बराच वेळ चेहऱ्यावर जाणवत होती.

Post a Comment

0 Comments