महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर वैषाली राहुल मोटे यांच्या नावाची चर्चा



महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आयोगाच्या नवीन प्रमुखपदी कोणाची नियुक्ती होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर वैशाली राहुल मोटे यांचे नाव जोरदारपणे चर्चेत आहे.

सध्या राज्यभर महिला सुरक्षेचे प्रश्न, तक्रारींची वाढती संख्या आणि संवेदनशील प्रकरणे लक्षात घेता महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी सक्षम, कणखर व महिलांच्या प्रश्नांवर थेट लढा देणाऱ्या व्यक्तिमत्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या निकषांवर वैशाली राहुल मोटे योग्य पर्याय ठरू शकतात, अशी चर्चा अधिक गती घेत आहे.

रुपाली चाकणकर यांच्या कार्यकाळात महिला अत्याचार प्रकरणांवरील सुनावणी, उपक्रम राबविणे आणि राज्यातील महिलांशी संवाद वाढविण्यावर भर देण्यात आला होता. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे आयोगात रिक्त झालेल्या पदावर कोणाची निवड होते, हे पाहणे उत्सुकतेचा विषय बनले आहे.
दरम्यान, वैशाली राहुल मोटे यांची नियुक्ती झाली तर महिला आयोगाच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशीही अपेक्षा काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments