महाराष्ट्र विद्यालयतील विज्ञान प्रयोगाची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड


महाराष्ट्र विद्यालय बार्शीतील सन २०२४-२५ मधील फूड डिस्पेन्सर या प्रयोगाची शासनाच्या तालुकास्तर, जिल्हास्तर ,विभाग स्तर व राज्य स्तर या सर्व टप्प्यांवर अव्वल क्रमांक मिळवत आता राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनीसाठी या प्रयोगाची निवड झाली आहे. हा प्रयोग सादर करणारे   विद्यार्थी पुढीलप्रमाणे चि तनवीर तांबोळी व  सहाय्यक विद्यार्थी चि श्रेयस जगताप  महाराष्ट्र विद्यालयाच्या इतिहासात  प्रथमच विद्यालयाचे विज्ञान उपकरण राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनामध्ये गेलेले आहे. चि तनवीर तांबोळी व चि श्रेयस जगताप या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फूड डिस्पेन्सर या प्रयोगासाठी त्यांना विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री संग्राम देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशासाठी तनवीर तांबोळी व श्रेयस जगताप व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव ,उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे,संस्थेचे सचिव पी.टी. पाटील,सहसचिव ए.पी. देबडवार , संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ मिराताई यादव व एस.बी. शेळवणे, सर्व कार्यकारिणी सदस्य ,सर्व संस्था सदस्य, बार्शी पंचायत समितीचे ग.शि बालाजी नाटके,न.पा.नगरपालिका प्रशासनाधिकारी भारत बावकर, संजय जवंजाळ,संजय भस्मे , विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे, पर्यवेक्षक एस.सी.महामुनी, पर्यवेक्षिका एन.बी. साठे, विज्ञान प्रमुख एस एम हाजगुडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments