धामणगांव (दु) येथे सरपंचपदी सुप्रिया केशव जगताप यांची बिनविरोध निवड


धामणगांव (दु) ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत सौ. सुप्रिया केशव जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीला सोसायटी चेअरमन नाना पाटील, माजी सरपंच एस.के. पाटील, उपसरपंच पंकज देशमुख, बाबासाहेब शिंदे, राजाभाऊ शिंदे, युवराज पाटील, विष्णु ढेकणे, भिमराव आलाट, केशव जगताप, किसन भोसले, महेश बोधले यासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणूक अधिकारी लांडगे, तलाठी एम.एस. बकाले, ग्रामसेवक राहुल गरड, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. हळे आणि पोलिस पाटील गणेश मसाळ या पदाधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. निवडीनंतर उपस्थितांनी आनंदोत्साहाच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी केली तसेच गुलालाची उधळण करून नव्या सरपंचांचे स्वागत केले. सर्वसाधारणपणे सुव्यवस्थित पार पडलेल्या या निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments