माणुसकी, प्रेम आणि दया — हे वयाने नाही तर मनाने ठरते ❤️


आज सकाळी ३ वर्षांचा श्रीयांश आपल्या अंगणात खेळत होता. त्याच्याकडे चेंडू, छोटं सायकल आणि काही खेळणी होती.
अचानक त्याला झुडपाजवळ काहीतरी हालचाल दिसली.
तो जवळ गेला तर काय पाहतो — एक छोटासा ससा जखमी अवस्थेत बसलेला! 🐰💔

श्रीयांश घाबरला नाही. त्यानं अलगद त्या सशाला उचललं आणि बाबा  कडे धावत गेला,
बाबा , बघ ना! हा पडला आहे, दुखलंय त्याला!”


बाबा हसत सशाला उबदार कापडात गुंडाळलं,
त्याला थोडं पाणी आणि दूध दिलं. काही तासाने तो ससा बरा झाला.

बाबा म्हणाले बाळा, तू त्याला जीवदान दिलंस.”
श्रेयांश हसत उत्तर दिलं, “बाबा मी फक्त माझ्या मित्राला मदत केली.” 🌸


🌿 कथेची शिकवण:

माणुसकी, प्रेम आणि दया — हे वयाने नाही तर मनाने ठरते ❤️
श्रीयांश गणेश झोळ

Post a Comment

0 Comments