भूम | पंधरा वर्षाच्या दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, भूम पोलिसात गुन्हा दाखल


भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १४ वर्ष ८ महिन्यांची मुलगी यांच्यावर गेल्या शनिवारी दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेय लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच तरुणांविरोधात कठोर कारवाईची तयारी आहे.

दि. १७ ऑक्टोबर रोजी पहाटे १ वाजतासुधा घरी एकट्या राहणाऱ्या पीडित मुलगी आणि तिच्या आईवर गावातील पाच तरुणांनी हल्ला केला. त्यांनी आईस शिवीगाळ करून घराची बाहेरून कडी लावून टाकली व नमुद तरुणांपैकी एकाने त्या मुलगीला जबरदस्तीने शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतर तरुणांनी या प्रकाराची कोणाकडेही तक्रार केल्यास आई-मुली दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने भूम पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी खबर दिली.

पोलीस तपासानंतर, भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसोबत पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८, १२ तसेच अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ च्या कलम ९२(ड) अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. पोक्सो कायदा, २०१२ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आलेला एक मजबूत कायदा आहे. तर अपंग व्यक्ती अधिनियमानुसार अपंग व्यक्तींचा छळ केल्यास पाच वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.

Post a Comment

0 Comments