कोल्हापूर : लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार आयोजित 'काव्यांगण' हे निमंत्रितांचे कविसंमेलन शनिवारी (ता.१८) राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे दुपारी साडेचार वाजता रंगणार आहे. काव्य रसिकांनी या काव्य मैफिलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराने केले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात शिक्षणासाठी एकत्र आलेल्या आणि शाहू विचारांनी प्रेरित झालेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील तरूणांनी एकत्र येत सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याच्या उद्देशाने ऊर्जा परिवाराची स्थापना केली आहे. या अंतर्गत 'काव्यांगण' चे हे चौथे वर्ष आहे. श्रीमंत सौ.मधुरिमाराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी प्रमुख पाहूणे म्हणून तेज घाटगे (उद्योगपती), प्रणिल गिल्डा (पोलिस उपअधिक्षक, मिरज), अरविंद रायबोले (पोलिस उपअधिक्षक, अहमदपूर), सुभाष दळवी (उद्योगपती), राहुल माने (उद्योगपती), सर्जेराव पाटील (मार्गदर्शक, ऊर्जा परिवार), तनुज्जा शिप्पूरकर (सामाजिक कार्यकर्त्या), देवानंद पाटील (सरपंच, निढोरी) असणार आहेत.
संदीप जगताप (नाशिक), गोपाल मापारी (बुलढाणा), विश्वास पाटील (राधानगरी), रोहित शिंगे (इचलकरंजी), निलेश चव्हाण (छ.संभाजी नगर), सांची कांबळे (रत्नागिरी), सारंग पांपटवार (नांदेड) हे सुप्रसिद्ध कवी संमेलनात सहभागी होणार आहेत.
0 Comments