पुणे/बार्शी |
अतिवृष्टी बाधितांना वाढीव नुकसान भरपाई द्या, पोटखराब, सामूहिक क्षेत्र अशा व इतर चुकीच्या त्रुटी काढून वगळलेले तसेच २०२३ व २०२४ मध्ये खरीप व रब्बीतील राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा पिकविमा द्या या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील ओरिएंटल विमा कंपनीचे वाकडेवाडी येथील राज्यस्तरीय कार्यालयात तसेच कृषी आयुक्तालय पुणे यांचे कार्यालयात एक ऑक्टोबर रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते, त्यानंतर दहा दिवसात मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन मिळाले होते परंतु अतिवृष्टीची वाढीव नुकसान भरपाई व पोट खराब आणि सामूहिक क्षेत्राच्या नावाखाली वगळलेल्या शेतकऱ्यांना व चालू खरिपातील पिकविमा देण्याचे निर्णय झाले असले तरी, सन 2023 व 2024 च्या खरीप आणि रब्बीच्या पिकविम्या पासून अजूनही महाराष्ट्रातील अनेक शेतकरी वंचित असल्याचे फोन येऊ लागल्यामुळे कालपासून पुन्हा पिकविमा कंपनी कार्यालय व आयुक्त कार्यालयात ठिय्या व मुक्काम आंदोलन सुरू झाले असून मागण्यांची पूर्तता होत नाही.
तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नसून यामध्ये पोलिसांचा अडथळा आल्यास मंत्रालय, कृषीमंत्री किंवा मुख्यमंत्री यांचे कार्यालय व घरावर आंदोलन करणार असल्याचा खणखणीत इशारा शंकर गायकवाड यांनी यावेळेस आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला, त्यावेळी महादेव काशीद, दिलीप चव्हाण, शरद भालेकर, सुशांत गव्हाणे, दिलीप आगलावे, अविराज आगलावे, सुजित आगलावे, रविकांत पाटील, अक्षय उंबरे, वैजनाथ शिंदे, गंगाधर जाधव, दयानंद गंभीरे, दिगंबर शेळके, दत्तात्र्य अंबुरे, आनंद नलवडे, समाधान जाधव, हनुमंत जगताप, तानाजी माळी, ब्रह्मदेव अंबुरे, राहुल हंगरकर, मुकुंद जाधव, शरद कोंढारे, अनिकेत पाटील, समाधान पाटील, दशरथ भंडारे, विशाल शेळके, अमर शेळके, राहुल गोरे आदींसह बहुसंख्य शेतकरी आंदोलनात सामील झालेले आहेत.
वाकडेवाडी येथील विमा कंपनी कार्यालयात सुरू असलेल्या आंदोलनाचा खडकी पोलीस स्टेशनच्या वतीने तर आयुक्तालयात सुरू असलेल्या आंदोलनाचा बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
0 Comments