सिल्वर जुबली हायस्कूलचा विजयगाथा! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र


बार्शी : शहराचा गौरव वाढविणारी एक आनंददायी बातमी आहे. शहरातील सिल्वर जुबली हायस्कूलच्या १९ वर्षाखालील मुलांच्या टेबल टेनिस संघाने विभागीय स्पर्धेत ऐतिहासिक यश मिळवले आहे. सोलापूर संघाचा सामना जोमदार पद्धतीने हरवून या तरुण खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

या विजयी संघात सुजित खुरंगळे, वेदांत खलादे, ओंकार मुळे, अथांग आइनापुरे, सोहम उंब्रदंड आणि अवधूत चौधरी या खेळाडूंचा प्रत्यक्ष सहभाग होता. या सर्व खेळाडूंनी एकजूटीने तसेच कौशल्याने खेळून शाळेचा तसेच बार्शी शहराचा गौरव वाढविला आहे.

या संघाला मार्गदर्शन करणारे शिक्षक ऐनापुरे यांचे मार्गदर्शन या यशामागे महत्त्वाचे साधन ठरले आहे. त्यांच्या मेहनतीचे आणि खेळाडूंच्या कठोर परिश्रमाचे हे फळ आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक या यशाने अतिशय उत्साहित आहेत.

संपूर्ण शाळा परिवाराच्या वतीने सर्व विजेता खेळाडूंचे तसेच ऐनापुरे सरांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments