वाशी |
वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ३० वर्षीय युवतीवर चार तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दि. १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ९ वाजता ते दि. १६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ८ वाजेपर्यंत पीडितेला चार चाकी गाडीत जबरदस्तीने नेण्यात आले होते. चार पैकी एका जणांनी अमानवी लैंगिक अत्याचार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात चार आरोपींपैकी एका तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर इतर तिघांनी पीडितेला या घटनेबद्दल कोणालासुद्धा काही सांगितल्यास तिचा जीव घेण्याची धमकी दिली. भीतीपोटी सुरुवातीला बोलता न आलेल्या पीडितेने शेवटी धैर्य करून दि. १८ सप्टेंबर रोजी वाशी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(ड), ३५४, ५०६(२), आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून अधिक तपास पोलीस करत आहेत.
0 Comments