माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन



राज्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी आज श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे सदस्य अमर राजुरकर हे देखील उपस्थित होते.

दर्शनानंतर मंदिर संस्थानच्यावतीने खासदार अशोक चव्हाण यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आमदार अमर राजुरकर यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

या वेळी तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, तसेच मंदिर संस्थानचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments