स्त्री रुग्णालयाला वाढीव जागा द्या - शहर काँग्रेसची मागणी



धाराशिव |

येथील स्त्री रुग्णालयाला शेजारील जागा हस्तांतरित करून महिला रुग्णांची सोय करावी, अशी मागणी आज शहर काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देऊन करण्यात आली.

शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज पालकमंत्री यांची भेट घेऊन स्त्री रुग्णालयाला सध्याची जागा अपुरी पडत असून जिल्हाभरातून गरोदर महिला प्रसूती साठी येत असतात. त्यांची गैरसोय दूर होण्यासाठी वाढीव जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, युवा नेते अझर पठाण, महादेव पेठे, संजय गजधने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments