धाराशिव (उस्मानाबाद) येथे नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात नगरपरिषद आणि राज्य शासन पूर्णतः अपयशी ठरल्याच्या आरोपासह काँग्रेस पक्षाने जोरदार आंदोलन केले. नगरपरिषद गेटसमोर पक्षाचे नेते आणि शेकडो कार्यकर्ते एकत्रित झाले होते.
आंदोलनादरम्यान शहरातील गंभीर प्रश्नांवर घोषणा केल्या गेल्या. यामध्ये अतिशय अस्वच्छता, भटक्या जनावरांचा त्रास, धिम्या गतीची भुयारी गटार योजना, दुर्दशाग्रस्त रस्ते, पाणीटंचाई, बंद पडलेले पथदिवे, कचरा डेपोची दुर्गंधी आणि उद्यानांचा अभाव या मुद्द्यांवर भर होता.
काँग्रेसने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्या श्रीमती नीता अंधारे आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर 13 मुख्य मागण्यांचे निवेदन दिले. यात सर्व प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
नेते विश्वासराव शिंदे, राजाभाऊ शेरखाने, डॉ. स्मिता शहापूरकर यांसह अनेक जिल्हा आणि शहरस्तरीय नेते आंदोलनात सहभागी झाले होते. पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे, की जर प्रशासनाने लगेचच या प्रश्नांवर कार्यवाही केली नाही, तर आणखी मोठे आणि उग्र आंदोलन करण्यात येईल.
0 Comments