तुळजापूर येथे अपघातात तरुणाचा मृत्यू; मित्रावर गुन्हा दाखलव


तुळजापूर : लातूर-सोलापूर बायपास रोडवर झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, या अपघातासाठी मृताच्या मित्रावर तुळजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता सिंदफळ गावाच्या हद्दीतील लातूर-सोलापूर बायपास रोडवर हा अपघात झाला. आरोपी कासिम अली मुस्लिम अली (वास्तव्य: डावरगाव, ता. भालकी, जि. बिदर, कर्नाटक) हा मोटारसायकल चालवत होता व त्याच्या मागे बसलेला अमर नागनाथ पांचाळ (वय २१, वास्तव्य: डावरगाव, ता. भालकी, जि. बिदर, कर्नाटक) हा यात प्रवासी होता. स्पीड ब्रेकरवर गाडी न आवडल्यामुळे जोरदार अपघात झाला यामध्ये अमर पांचाळ हे गंभीरित्या जखमे होऊन त्यांचा मृत्यू झाला.

मृतकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन कारवाई करत तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी कासिम अली विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ (निष्काळजीपणे वाहन चालवणे), ३०४अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू), ३३७ (शारीरिक इजा करणे) आणि ३३८ (गंभीर शारीरिक इजा करणे) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ (धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments