कळंब |
जिल्ह्यातील कळंब शहरात एका निष्काळजी वाहन चालकामुळे एका ४७ वर्षीय व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर वाहन चालक तेथून पळून गेल्याने पोलिसांनी त्याच्या शोधासाठी चौकशी सुरू केली आहे.
सुमारे सात दिवसांपूर्वी, १७ ऑगस्ट रोजी सकाळी अंदाजे ५:३० वाजता ही घटना घडली. मयत विलास लक्ष्मण गंधुरे (वय ४७, रहिवासी इंदिरा नगर, कळंब) येरमाळा ते कळंब येणाऱ्या रस्त्यावर, सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या समोर पायी चालत होते. त्यावेळी मांजरा ट्रॅव्हल्स कंपनीच्या एमएच २९ बीई ९८९८ या वाहनाचा चालक ते वाहन अतिशय वेगवान आणि निष्काळजीपणे चालवत होता. त्याने पाठीमागून येऊन विलास गंधुरे यांना धडक मारली. या जोरदार आघातामुळे ते गंभीर जखमी झाले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर संशयित वाहन चालकानेजखमी व्यक्तीस उपचारासाठी मदत करण्याऐवजी, तो आपल्या वाहनासह ताबडतोब घटनास्थळावरून पसार झाला. सध्या तो चालक अज्ञात ठिकाणी लपून आहे. मृतकाच्यापत्नी, स्वाती विलास गंधुरे (वय ३२) यांनी घटनेनंतर सात दिवसांनी, २४ ऑगस्ट रोजी कळंब पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांच्या निवेदनावरून पोलिसांनी ताबडतोब गुन्हा नोंदवला आहे. संशयित चालकाचा शोध लावून त्याला अटक करण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.
0 Comments