सिरसाव शिवारामध्ये भुरट्या चोरांचा धुमाकूळ; शेतातील विद्युत मोटार व वायरची चोरी
परंडा
गेल्या काही दिवसापासून परंडा तालुक्यातील शिरसाव शिवारामध्ये भुरट्या चोराने धुमाकूळ घातला आहे. १ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पंपाची वायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तीन चोरटे कैद झाले त्यांचे चेहरे पुसट दिसत आहेत.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची फिर्याद रुपेश रामराव चोबे (वय ३७ रा. सिरसाव ता. परांडा) जवळा शिवारामध्ये असणाऱ्या शेतामध्ये एक ऑगस्ट रात्री आठ ते साडेबारा पंपाचे ३०० फूट वायर, विद्युत मोटार त्याची किंमत १७००० चोरून नेली आहे. फिर्यादीची आई किस्किंदा चोबे यांच्या नावे असलेल्या शेतामध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल घोळवे हे करत आहेत.
या घटने शिवाय सिरसाव शिवारामध्ये भुरट्या चोरांना होत आला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून सोलार प्लेट, वायरी या पांडुरंग जनार्दन चोबे यांच्या शेतातील हे ५००० किंमतीची वायर चोरीला गेली आहे शेतातील इतर वस्तूही चोरीला गेल्याच्या घटना घडत आहेत.
0 Comments