पोटाची खळगी भरण्यासाठी एक बंगाली कुटुंब लातूर जिल्ह्यातील मुरूड इथं आलं होतं. या कुटुंबात एक अल्पवयीन तरुणी होती. तिचे वडील मिळेल ते काम करुन कुटुंब चालवत होतं. तर ही तरुणी एका महाविद्यालयात शिकत होती. एक दिवस फोटो काढण्यासाठी ती एका फोटो स्टुडीओत गेली होती. तिथे तिची आरोपी तरुणी बरोबर ओळख झाली. त्यानंतर या दोघांची ओळख वाढत गेली. या ओळखीचा गैरफायदा त्या तरुणाने घेतला.
एक दिवस तो त्या तरुणीला घेवून लॉजवर गेला. तिथेच तिला त्याने गुंगीचे औषध दिले. दारू ही पाजली. त्याच अवस्थेत त्याने तिच्याबरोबर शरिर संबंध प्रस्थापित केले. तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने शरिर संबंध करतानाचा व्हिडीओ ही काढला. या व्हिडीओच्या माध्यमातून तो तरुण तिला वारंवार ब्लॅकमेल करून तिचे शोषण करत होता. पुढे तर त्याने कहरच केला. शरिर संबंधाचा व्हिडीओ त्याने थेट त्यामुलीच्या वडीलांनाच पाठवला. त्यामुळे त्या मुलीची बदनामी झाली.
तातडीने पीडित तरुणी आणि तिच्या वडीलांनी पोलिस स्थानकात धाव घेतली. शिवाय झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनीही गांभीर्य लक्षात घेत गुन्हा नोंदवून घेतला आहे. शिवाय दोन आरोपींना अटकही केली आहे. या आरोपीने आणखी काही मुलींना अशाच पद्धतीने फसवल्याची माहितीही समोर येत आहे. मुलींना फसवून त्यांचे व्हिडीओ काढून तो त्यांना ब्लॅकमेल करत असे. शिवाय त्यांचे शारिरीक शोषण ही करत असे अशी माहिती समोर येत आहे.
0 Comments