चिखली/बोरगाव (ता. व जि. धाराशिव) – येथे सनस्ट्रीम ग्रीन एनर्जी प्रा. लि. या खासगी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींमधून वीजवाहिनीची लाईन टाकली जात असल्याच्या विरोधात येथील शेतकऱ्यांनी लेखी अर्जाद्वारे प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी घेतलेली नाही तसेच शेतकऱ्यांशी चर्चा न करता थेट त्यांच्या शेतातून लाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे. एका शेतकऱ्यांच्या शेतात तर तब्बल १३ पोल बसवण्यात आले असून, कंपनी कोणत्या अधिकाराने हे काम करत आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
"खासगी कंपनीने व्यावसायिक कामासाठी आमच्या जमिनींचा वापर करताना आम्हाला कोणताही लाभ दिलेला नाही. आम्ही प्रकल्पाला विरोध करत नाही; मात्र इतर ठिकाणी जसा मोबदला दिला जातो, तसा आम्हालाही मिळावा. तोपर्यंत हे काम आम्ही होऊ देणार नाही," असे स्पष्ट मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
या संदर्भात शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या समितीमार्फत संबंधित कंपनीला तातडीने योग्य ती कारवाई करण्याची तसेच शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
0 Comments