वाशी |
वाशी तालुक्यातील सारोळा येथे एका कुटुंबात झालेल्या प्रेमविवाहामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या वादामध्ये व्यक्तीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेसंदर्भात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी,संध्याकाळी सहा वाजता सारोळा गावाच्या शिवारातील एका गोठ्यावर ही घटना घडली. फिर्यादी कमल अशोक कवडे (वय ५२) यांच्या मुलाने आरोपी पक्षाच्या भाचीशी प्रेमविवाह केल्यामुळे या दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर, आरोपी व्यक्तींनी गैरकायदेशीर मंडळी जमवून फिर्यादीकडे जाऊन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी गटाने कमल कवडे यांना लाथा-मुक्या, कोयता आणि कुहाडीने हल्ला केल्याचे नमूद केले आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, आरोपी गटाकडून 'जीवे मारण्याची' धमकीही दिलेली आहे. या घटनेनंतर फिर्यादी कमल कवडे यांनी दिनांक २४ ऑगस्ट रोजी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या गुन्ह्यात सचिन वामन कवडे, नितीन वामन कवडे, वर्षा नितीन कवडे, राजश्री सचिन कवडे, शकुंतला वामन कवडे अशा सहा आरोपींचा समावेश आहे. सर्व आरोपी सारोळा गावाचे रहिवासी आहेत.
0 Comments