घरगुती वादातून आईची हत्या, मुलगा व सुनेविरोधात गुन्हा दाखल; हत्या करून केला सुसाइडचा बनाव



लोहारा : घरगुती भांडणामुळे धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथे आपल्याच मुलाने आणि सुनेने आईची लाथाबुक्यांनी हत्या केली आहे. मयत उमाबाई सुरेश रणशुर (वय ५५) यांना ठार मारून गळफास लावून सुसाइडचा बनाव केल्यानंतर आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 ही घटना गेल्या २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १ वाजता लोहारा येथील आरोपींच्या घरी घडून आली. घरगुती भांडणामुळे आरोपी सौदागर सुरेश रणशुर आणि त्याची पत्नी पूजा सौदागर रणशुर यांनी उमाबाईंवर प्रथम शिवीगाळ केली व नंतर लाथाबुक्यांनी त्यांची हत्या केली. खुनाचा गुन्हा लपवण्यासाठी मयत आईच्या शरीराला साडीने गळफास देऊन गुन्हा लपवण्याचाही आरोप आहे.

या घटनेनंतर मृत उमाबाईंच्या दुसर्या मुलाने पोलिसांकडे तक्रार केली. महेश सुरेश रणशुर (वय ३५) या तक्रारदाराने गेल्या २६ ऑगस्ट रोजी लोहारा पोलिस ठाण्यात येऊन प्रथम खबर दाखल केली. अशी माहिती लोहारा पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

Post a Comment

0 Comments