चोराखळी येथे कलाकेंद्राच्या बाहेर गोळीबार; जुन्या वादातून २ जणांवर कोयत्याने हल्ला



धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथे अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला आहे, जुन्या वादातुन २ जणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना धाराशिव येथील महाकालिका कला केंद्रावर घडली आहे. संदीप बुट्टे व रोहित जाधव या २ जणांना मारहाण करण्यात आली असून संदीप याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून तो सुदैवाने वाचला आहे, त्याच्यावर धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

अक्षय साळुंके, राज पवार, पवन पौळ, अक्षय कदम या ४ जणांसह इतरांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. महाकाली कला केंद्रावर हा प्रकार घडला असून यामुळे या भागातील कला केंद्र वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. संदीप व रोहित हे महाकाली कला केंद्रावर गेले होते त्यावेळी जुन्या वादातुन त्याच्यावर २५ ते ३० जणांच्या जमवाने हल्ला केला. तलवार, कोयत्याने हल्ला केल्यानंतर एक गोळी झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती नातेवाईक यांनी दिली आहे. 

Post a Comment

0 Comments