धाराशिव मध्ये शिवसेनेचे राज्य समन्वयक राजन साळवी यांच्या बैठकीत राडा झाला. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बॅनर वरून फोटो हटवल्यानंतर नाराज झालेल्या सावंत समर्थकांनी साळवी यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. तानाजी सावंत जिल्ह्यातील एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांचा बॅनर वर फोटो का नाही? असा सवाल करत कार्यकर्त्यांनी साळवी यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली.
साळवी यांच्यासमोर जवळपास अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. भूम परंडा मतदारसंघातील सावंत समर्थक बैठक सोडून अर्ध्यातूनच निघून गेले. राजन साळवी यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता. मात्र,आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार तानाजी सावंत यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान आज झालेल्या नाराजीनाट्याची चर्चा झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
0 Comments