धाराशिव | शेतात बोलून महिलेवर लैंगिक अत्याचार बेंबळी पोलिसात गुन्हा दाखल



धाराशिव जिल्ह्यातील एका गावामध्ये शेतात काम करण्याच्या उद्देशाने बोलवून लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास पीडित ४० वर्षीय महिलेला शेतामध्ये काम करण्याच्या उद्देशाने बोलून घेऊन शेतातील लिंबाच्या झाडाखाली बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या घटनेचा अधिक तपास बेंबळे पोलीस करत आहे. आरोपी तरुणा विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट व भारतीय दंड संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments