मंगळवेढ्यात सिनेस्टाईल मृत्यूचा थरार; पत्नी प्रियकरासोबत सापडली, जळालेल्या मृतदेहाचे गुढ उकलेना

मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांच्या पत्नी किरण राहत होत्या. 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरणने आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली. यानंतर किरणचा नवरा नागेश हा पत्नी वियोगाने रडत होता. त्याचवेळी किरणचे वडील देखील घटनास्थळी पोहोचले. किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही. तात्काळ किरणच्या वडिलांनी पोलिसांना आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्याची विनंती केली.

किरणने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये मृत्यू पावलेली आहे असं समजत असलेली किरण कराडमध्ये एका तरुणांसोबत राहत असल्याचे आढळून आले. याबाबत किरण आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाची सध्या पोलीस चौकशी करत आहेत.

मात्र, या सर्व घडामोडींमध्ये किरण जिवंत असेल तर तिच्या जागी कुठल्या महिलेचा मृतदेह कडब्याच्या गंजीत जळाला. हा प्रश्न पुढे येत आहे. याबाबत संबंधित मृतदेहाचे सॅम्पल फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा मृत्यूचा थरार आणि ट्विस्ट मंगळवेढ्यातील घटनेने पुढे आला आहे.

Post a Comment

0 Comments