आपण रोज पाहतो की कबूतरं, चिमण्या किंवा इतर पक्षी थेट वीजेच्या तारेवर बसतात… आणि काहीच होत नाही! पण असे का?
यामागचं शास्त्र जाणून घ्या:
✅ पक्ष्याचे दोन्ही पाय एकाच तारेला लागलेले असतात.
✅ त्यामुळे वीजेचा प्रवाह त्याच्या शरीरातून वाहण्यासाठी दुसरा मार्ग मिळत नाही.
✅ वीज नेहमी उच्च दाबातून नीच दाबाकडे वाहते. पण इथे दुसरी वायर किंवा जमिनीशी संपर्क नसल्याने, करंट शरीरातून वाहू शकत नाही.
पण... जर पक्ष्याने एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दाबाच्या तारांना किंवा तार आणि लोखंडी खांबाला स्पर्श केला,
तर वीजेचा प्रवाह सुरु होतो आणि तो धोकादायक ठरतो.
म्हणून माणसाने जर वायरला हात लावला आणि त्याचे पाय जमिनीवर असतील, तर वीज शरीरातून वाहून जमिनीकडे जाईल आणि करंट लागण्याचा धोका निर्माण होईल. वीज तेव्हाच धक्का देते, जेव्हा तिला शरीरातून जाऊन बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग मिळतो.
0 Comments