भूम तालुक्यातील एका गावामध्ये सत्तर वर्षीय वृद्ध महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी देत तरुणांनी अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
भूम तालुक्यातील एका गावातील ७० वर्षीय महिलेला (नाव- गाव गोपनीय) दिनांक २० जुलै रोजी रात्री सहा ते साडेदहा दरम्यान गावातील तरुणाने मोटरसायकलवर बसवून घेवून जाऊन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्या महिलेला सोयाबीनच्या शेतात घेवून जावून तिच्यावर बळजबरीने लैंगीक अत्याचार केला.
वृद्ध महिलेवर अत्याचार केल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडली आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यामध्ये लैगिंक अत्याचार घटनामध्ये वाढ होत आहे.
0 Comments