वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विदयार्थ्यांना शालेय साहित्य वाटप


परंडा\प्रतिनिधी:

तानाजी खाडे यांनी मुलाच्या कार्तिक तानाजी खाडे याच्या पहिल्या वाढदिवसानिम्मित जि प प्रा शाळा  काटेवाडी येथे इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थीना प्रत्येकी चार वह्या व दोन पेन असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडीतील मुलांना पाटी व पेन्सिल पुढा वाटप करण्यात आला.

खाडे यांनी मुलगा कार्तिक च्या पहिल्या वाढदिवसानिम्मित अनावश्यक खर्च टाळून जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप करून एक आगळा वेगळा समाज पूरक उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाबाबत शाळेचे मुख्याध्यापक ए एस कोळी यांनी आभार मानले. सहशिक्षिका एस बी बी गिरी यांनी खाडे कुटूंबियांचे आभार मानले. या प्रसंगी तानाजी खाडे, प्रवीण खाडे, निवांत खाडे, पांडुरंग खाडे, अशोक खाडे, खाडे कुटूंब व मित्र परिवार उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments