राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही भन्नाट योजना राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रत्येकी महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर जमा देखील झाला आहे. अशातच आता महिला दुसऱ्या टप्प्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
बँक खात्यावर आधार नंबरला लिंक असणे बंधनकारक :
अशातच आता ज्या महिलांना जुलै महिन्याचे म्हणजेच पहिल्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे एकत्रित मिळून तब्बल 3000 रुपये मिळणार आहेत.अशातच आता पुन्हा या योजनेचे पैसे वाटण्यास सुरवात देखील झाली आहे. मात्र राज्यातील अनेक महिलांना बँक खात्यात पैसे आले की नाही हे देखील माहित नाही. त्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे आले की नाही हे कसे चेक करायचे हे आज आपण जाणून घेऊयात…
या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळालेले आहेत, त्या महिलांना आता सप्टेंबर महिन्यात 1500 रुपये मिळणार आहेत. तर ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण मिळून 4500 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये मिळणार आहेत. मात्र त्यासाठी बँकेचा अकाऊंट नंबर आधार नंबरला लिंक असणे बंधनकारक असणार आहे.
बँक खात्यात पैसे आले की नाही अशाप्रकारे चेक करावे? :
– ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून तुमच्या बँकेत पैसे जमा झाले की नाही हे विचारू शकता.
– तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून चेक करू शकता.
– तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला टेक्स्ट मेसेज येईल.
– तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊन देखील तपासू शकता.
0 Comments